नगर : मुळा कालव्यातील पाणी कालव्यांमधून जात नसताना पाण्याचे अपव्यय होऊन शेतीतील पिकांचे नुकसान होत आहे. या प्रकरणाकडे लक्ष न देणार्या कर्मचार्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पाथर्डी तालुका मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामदास बर्डे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रामेश्वर कर्डिले आदी या उपोषणात सहभागी झालेले आहेत.
हनुमान टाकळी (ता. पाथर्डी) येथे कोपरे हद्दीतील मुळा कालवामधील पाणी कालव्यांमधून न जाता कालवा सोडून जात आहे. गेल्या सहा दिवसांपासून पूर्ण दाबाने पाणी सोडल्यामुळे कालवा शेजारील शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. हे पाणी कोणाच्याही उपयोगाला येत नसून, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. या प्रश्नाकडे कर्मचार्यांचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
Post a Comment