जीवनात पहिलं एकदा तरी प्रेमाचा अनुभव यावा , हे प्रत्येकाला वाटतं , पण जर टिकल तर ठिक नाही तर जीवन पूर्ण विस्कळीत होतं . मी कॉलेजला जात होतो. प्रेमाचा तसा काहीच अनुभव नव्हता आणि प्रेम म्हणजे काय .. ? हे पण निट माहित नव्हतं , पण माझ्या एका मित्राचं एका मुलीवर प्रेम होतं आणि तिचं व त्याच प्रेम पाहून मलाही कधी - कधी वाटत होतं की, आपल्या आयुष्यात देखील कुणीतरी असावं, आपली विचारपूस करणारं. कॉलेज व्यवस्थित सुरु होतं .
माझ्या एका मित्राचा वाढदिवस असल्याने त्याने तिला बोलावले आणि तिच्यासोबत तिच्या काही मैत्रिणीही होत्या. वाढदिवस आनंदात पार पडला, पण मी मात्र अस्वस्थ झालो होतो. कारण मला त्या मुलींमधील एक मुलगी फार आवडली होती.
मी मित्राकडे तिच्याबद्दल विचारणा केल्यावर त्याने मला तिची सर्व माहिती दिली ; परंतु माझ्यापुढे प्रश्न उभा होता की, काय आणि कसं बोलावं .. ? मग मी सरळ सोनालीला सांगितल की, मला तुझी मैत्रिण फार आवडते.
मला तिच्यासोबत लव्हशिप करायची आहे. तू मला मदत करशील का ? यावर ती होय म्हणाली. कारण मला ती चांगल ओळखत होती आणि तिने माझे पहिले प्रेम घडून आणले. आमचे प्रेमाचे गोड दिवस सुरु होते. दोघही नवीनच कधी प्रेम म्हणजे काय ? हे माहितच नव्हत. त्यामुळे आम्ही एकमेकांची जरा जास्तच काळजी घेत होतो ; परंतु नंतर आमचं कॉलन पूर्ण झाले. आमच्या भेटी - गाठी कमी होऊ लागल्या. अशातचं ती म्हणाली , माझ्याघरचे माझ्या लग्नासाठी मुलगा शोधत आहेत.
हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला काय करावं ? ते सूचत नव्हतं. तरी तिला धीर देत म्हणालो, तू काळजी कर नको. घरी सांगून टाक. नंतर आपण लग्न कर , पण ती काही तयार होत नव्हती . मग मीच थोडी हिम्मत करुन तिच्या भावाला सांगितले आणि त्याने माझी समजूत काढत सांगितले की, आता तू तिला विसरुन जा. तुमचं लग्न होणं शक्य नाही ; परंतु माझं मनं तयार नव्हतं. मला तिचं मत जाणून घ्यायचं होतं. मी सरळ त्याला सांगितले की , अश्विनी जर नाही म्हणत असेल तर मी नाही मध्ये येणार त्याला असे बोलून मी निघून आलो.
थोडे दिवस गेल्यानंतर मी तिला भेटण्यासाठी बोलावले ; परंतु तिने मला नकार दिला. मला वाटलं तिला घरच्यांकडून दबाव येत असेल. म्हणून नकार देतेय. मी तिला फोनवर समजून सांगितले, तू माझ्याशी लग्न करणार आहे की नाही, ते खरं सांग ? पण तिने काहीच न बोलता फोन कट केला. मला तर काहीचं कळत नव्हते. मला वाटलं ती मला विसरण्याचा सल्ला देत होती आणि घडलेही तसेच मग तिच मला भेटायला माझ्या घरी आली. तेही साखरपुड्याचं आमंत्रण घेऊन , मला तर धक्काच बसला होता. तिला कारण विचारले तर ती म्हणाली, माझं प्रेम खरं होतं आणि आजही आहे. ते तसचं माझ्या मनात टिकून राहिल, पण मी फक्त तुझी नाही होऊ शकत.
आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करील. इतक बोलून निघून गेली. मी गप्प बसून फक्त ऐकत होतो, पण ती जे बोलली ते खरं नव्हतं तर साफ माझ्या प्रेमाची फसवणूक आणि तडजोड होती, पण मी आजही तिला विसरलो नाही आजही तिची वाट पाहत आहे . कारण माझं ते पहिलं प्रेम होतं...
- सुनील
Post a Comment