जिल्ह्यात पुन्हा निर्बंध... दुकाने चारवाजेपर्यंतच सुरु राहणार...


नगर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव थोपविण्यासाठी जिल्ह्यात आता पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सोमवारपासून (ता. २८) दुकानांना सायंकाळी चार वाजेपर्यंतच व्यवहार करावे लागणार आहेत. तसा अध्यादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केलेला आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध पुन्हा लागू केले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नगर जिल्ह्यासाठी निर्बंध जारी केले. 

दुकाने सायंकाळी चार वाजता बंद करावी लागतील. शनिवारी व रविवारी अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद ठेवाव्या लागणार आहेत.

 लग्नसमारंभासाठी ५० व्यक्‍ती व अंत्यविधीसाठी २० व्यक्‍तींना उपस्थित राहण्यास परवानगी दिली गेली आहे. सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीवर कामकाज करण्यात करण्यात आले आहे. या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post