अमर छत्तीसे
नगर : खाकी कपड्यातील अधिकारी पाहिल्यानंतर भल्या भल्यांची पाचावर धारण बसते. पण चुकीच्या पध्दतीने कारभार झाला तर खाकीलाही चूपचाप बसावे लागते. असाच काहीसा प्रकार खाकीच्या बाबतीत घडला असून वाहनाची झालेली नुकसान रातोरात दुरुस्ती करून घेत पडदा टाकण्यात आलेला आहे.राज्य परिवहन, पोलिस, महावितरण आदी विभागात खाकी परिधान केली जाते. या विभागातील सर्वांना खाकीचा अभिमान आहे. या विभागातील अधिकार्यांसह कर्मचार्यांच्या या खाकी वर्दीला समाजातही मानाचे स्थान असून या बाकीचा दरारा आजही टिकून आहे.
समाजात खाकीला मान व दरारा कायम असला तरी टिकून असला तरी काहीतील काहींकडून चूक झाली त्याचा मनस्तापही त्यांनाच भोगावा लागतो. असे अनेक प्रकार जिल्ह्यासह राज्यात घडलेसे असून अनेकांनी त्याची शिक्षा भोगली आहे.
असाच काहीसा प्रकार जिल्ह्यात खाकीकडून घडलेला आहे. चुकीच्या पध्दतीने खाकीतील काहींकडून एका ठिकाणी वागणूक देण्यात आली. त्यामुळे जमाव संतप्त झाला. संतप्त जमावाने मग वाहनाची तोडफोड केली.
विशेष म्हणजे या घटनेची ना तक्रार ना भोबाटा करत हे प्रकरण दडपण्यात आले. विशेष म्हणजे मोडतोड झालेल्या वाहनाची रातोरात दुरुस्ती करून रात्री काहीच झाले नाही भासविण्यात आलेले आहे.
परंतु रात्रीच्या त्या प्रकरणाची जिल्हाभर चर्चा सुरु झालेली आहे. या अगोदरही त्या कार्यालयातील वाहन अनेकदा नादुरुस्त झालेले आहे. पण ते दुरुस्त होण्यास अनेक दिवस लागले आहेत.
मात्र त्याच दिवशी मोडतोड झालेल्या वाहनाची दुरुस्ती रातोरात कशी झाली? रात्रीतून ते वाहन दुरुस्ती करण्याचा खर्च कोणी केला यासह अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या विषयी सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरु आहे.
Post a Comment