कोविड योध्दा आमदार नीलेश लंकेच्या कार्याचा राज्यस्तरीय चित्रकाराकडून कलेच्या माध्यमातून सन्मान


पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांच्या कोरोना काळात केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी वासुंदे येथील राज्यस्तरीय चित्रकार प्रदीप बबनराव वाकचौरे यांनी कोरोना योद्धा समवेत चित्र रेखाटून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. 

कोरोनाच्या काळात आमदार नीलेश लंके यांनी कोरोना बांधित रुग्णांची रुग्ण सेवा केली. त्याच्या या कामाची जगाने दखल घेतली आणि प्रतिकात्मक सुपरहिरो आणि जनसामान्य त्यांना सलाम करत आहेत असे या चित्रात दाखवण्यात आले आहे. 

आमदार नीलेश लंके यांनी चित्र पाहून आमदार लंके यांनी समाधान व्यक्त करत प्रदिप वाकचौरे या चित्रकारावर कौतुकाची थाप टाकली आहे. एका सच्च्या कोविड योध्याचा सन्मान एका उमद्या चित्रकाराने केला.

या वेळी चित्रकार प्रदीप वाकचौरे जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जालिंदर वाबळे पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, उद्योजक संजय साळुंके, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवा नेते अमोल उगले, दत्तात्रय साळुंके, संतोष साळुंके, अनिकेत झावरे, आदी वासुंदे गावचे ग्रामस्थ देखिल उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांनी जीवावर उदार होऊन जिल्हासह महाराष्ट्रातील हजारो कोरोना बाधितांना जीवनादान दिले आहे.

चित्रपट क्षेत्रासह टिव्हिवरील मालिका सेट कलेच्या माध्यमातून उभे करत असलेले प्रदिप वाकचौरे याच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून सुपरमॅन आमदार नीलेश लंके यांच्या कार्याला सॅल्युट करताना दाखविला आहे. 

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शरदचंद्र पवार साहेब आरोग्य मंदिर या नावाने ११०० बेडचे कोरोना सेंटर उभारून अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना ज्यांनी आधार दिला. 

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांच्या कामाची दखल वासुंदे गावचे सूपुत्र आणि चित्रकार प्रदीप बबनराव वाकचौरे यांनी घेतली. त्यांनी आपल्या उत्कृष्ट अशा चित्र शैलीतून त्यांचे सुंदर असे चित्र रेखाटन करुन त्यांच्या कोरोना काळातील कामावर प्रकाश टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post