तलावात बुडून अकरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू...


कर्जत : कर्जत तालुक्यातील निंबे गावाजवळ तलावात बुडून ११वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी १९ रोजी दुपारी १२च्या सुमारास साजन राजेंद्र सावंत (वय ११वर्ष मूळ रा.भवरवाडी ता.जामखेड हल्ली रा.आंबीजळगाव ता. कर्जत) हा आपल्या आई तलावावर धुणे धुण्यासाठी जात असताना आईसोबत गेला आई धुणे धूत असताना त्याने आईची नजर चुकवून तो पाण्यात पडून बुडून  त्याचा मृत्यू झाला.

साजन हा एका ऊसतोडणी कामगाराचा मुलगा असल्याचे समजते आहे. याबाबत दिलेल्या खबरीवरून कर्जत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post