साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार नीलेश लंके यांची वर्णी लावा


पारनेर : साईबाबा संस्थानचे अध्यक्ष पदाच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीच्या हालचाली सुरू झालेले आहेत. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष पदी नीलेश लंके यांची वर्णी लावण्यात यावी अशी मागणी पारनेर नगर विधानसभा मतदार संघातील नागरिकांमधून होत आहे.

कोरनाच्या काळात आमदार नीलेश लंके यांचे कार्य जिल्ह्यात नव्हे  राज्यात उत्कृष्ट ठरलेले आहे. त्यांच्या नियोजनामुळे अकराशे बेडचे कोविड सेंटर भाळवणी येथे उभे राहिले होते या सेंटरमुळे अनेक रुग्णांना उपचार देणेभाळवणी येथे उभे राहिले होते या सेंटरमुळे अनेक रुग्णांना उपचार घेणे सोपे झाले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना त्यामुळे जीवदान मिळाले आहे या त्यांच्या कामाची दखल राष्ट्रवादी काँग्रेसने घेऊन त्यांचे कौतुकही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेले आहे. 

त्यांच्या या कामाची दखल राष्ट्रवादी काँग्रेसने घेऊन आमदार निलेश लंके यांना शिर्डी संस्थान च्या अध्यक्षपदाची संधी द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे. 

जिल्ह्यातील इतर नेत्यांना जे जमलं नाही ते लंके यांनी करून दाखविले आहे. त्यामुळे आमदार लंके यांना शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदाची संधी दिली तर ते अनेक विधायक कामे करून देवस्थानची कीर्ती जगभरात पोहचवू शकतात. 

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस साईसंस्थानच्या निवडीच्या वेळी आमदार लंके यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मत पारनेर जिल्हावासियांमधून व्यक्त होत आहे. आता पक्ष श्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post