नगर : या वर्षी मोसमी पाऊस दमदार होईल असाच अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. या अंदाजानुसार वेळेवरच मान्सून महाराष्ट्रासह देशभरात दाखल झाला. मात्र, आता त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच हवामान खात्याने आगामी दोन दिवस पाऊस दमदार हजेरी लावील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
आगामी दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ यासह अनेक ठिकाणी अनेक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.
विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बहुतांश राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. काही दिवसांपासून पाऊस झालेला नाही. यंदा मान्सूनमध्ये देशभरात चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक भागातील पेरण्या रखजल्या होत्या. मराठवाड्यात काही ठिकाणी कापसाला तांब्याने पाणी घालण्यात येत असल्याचे चित्र समाजमाध्यमावर प्रसारित केले जात होते.
आज शनिवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. नगर शहरासह परिसरात पावसाने सकाळपासूनच हजेरी लावली. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी साचले होते.
Post a Comment