नगर : जिल्ह्यात बाधिताचा वाढत चालल्याने आता सावधानी बाळगणे गरजेचे आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी बाधिताच्या आकड्यात वाढ झालेली आहे. शहरासह ग्रामीण भागात वाढता आकडा चिंताजनक आहे.
जिल्ह्यात बाधितांचा आकडा 758 आहे. जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात 18, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 338 तर अँटीजेन चाचणीत 402 असे एकूण 758 कोरोना बाधित आढळून आले.
संगमनेर तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली. संगमनेरमध्ये 119 जण बाधित आढळून आलेले आहेत. पाथर्डी तालुका सध्या जिल्ह्यात दोन नंबरला आहे. पाथर्डीमध्ये 86 बाधित आढळून आलेले आहेत.
पारनेर तालुक्याला दिलासा मिळालेला असून आज तिसर्यास्थानी आलेला आहे. तरी पारनेरमध्ये चिंता आहे. पारमेरमधील वाढत्या आकड्याने 71 गावात कडक निर्बंध लागू केलेले आहेत.
आज दिवसभरात पारनेर तालुक्यात 78 बाधित आढळले आहे. जिल्ह्यात पारनेर तालुका तिसर्यास्थानी आला आहे.
नगर शहरातील बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. नगर शहरात दिवसभरात 46 बाधित आढळून आलेले आहेत.
जिल्ह्यातील बाधितांचा आकडा वाढत असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. वेळी सावध भूमिका न घेतल्यास आगामी परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
Post a Comment