कोलंबो : कोरोनाची लागण श्रीलंकेच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना झाल्यामुळे भारत-श्रीलंका मालिका चार दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला होता. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै ऐवजी 17 जुलैला खेळवण्यात येणार होता. परंतु आता पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल केला आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ 13 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळवण्यात येणार होते. परंतु दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे सामने पुढे ढकलण्यात आले.
खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मालिका पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्रीलंका बोर्डाने सांगितले आहे.
पहिला एकदिवसीय 17 जुलैला खेळवण्यात येणार होता. परंतु आता नव्या वेळापत्रकानुसार पहिला एकदिवसीय सामना 18 जुलैला होणार आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिला एकदिवसीय सामना 18 जुलै, दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना अनुक्रमे 20 व 23 जुलैला खेळवण्यात येणार आहे.
Post a Comment