टँकरच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार, एक जखमी


नगर : टॅंकरने पुढे चाललेल्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्य दुसरा जखमी झाला. 

ही घटना खेडगाव जवळील नगर सोनेवाडी रस्त्याजवळील श्रेया गार्डन जवळ घडली.

अक्षय सतीश जाधव (वय 27, रा. इंदिरानगर नगर दौंड रस्ता, नगर) व अमोल रमेश कदम (वय  2, रा. विद्यानगर नगर दौंड रस्ता, अहमदनगर) हे दोघे त्यांच्या दुचाकी वरून सोनेवाडी रस्त्याने जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टॅंकरने पुढे चाललेल्या दुचाकीलाला जोरात धडक दिली. 

या अपघातात अक्षय जाधव (वय 27 रा. इंदिरानगर नगर दौंड रस्ता, नगर) याचा जागीच मृत्यू झाला. 

अमोल रमेश कदम (वय 21, रा. विद्यानगर नगर दौंड रस्ता, नगर) हा गंभीर जखमी झाला.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अमोल कदम यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास  पोलिस हवालदार बाबासाहेब इखे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post