अकोले : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी आहे. पण पोलिसांची नजर चुकवून अनेक जण पर्यटनस्थळी गर्दी करत आहेत. पाऊस आणि विकेंडमुळे अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची झुंबड उडात आहे. भंडारदरा धरण परिसरातही पर्यटकांनी गर्दी केली आहे. यावेळी काही मद्यधुंद पर्यटकांनी पोलिसांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
भंडारदरा धरणात एक जण बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उपस्थित असलेल्या पर्यटकांना जाण्यास सांगितले.
त्याचवेळी मद्यधुंद असलेल्या पाच जणांना पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. यावेळी एका पोलिसाची नेम प्लेटही तुटली. त्यामुळे तिथले वातावरण काही तणावपूर्ण झालं होते.
स्थानिक दुकानदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पर्यटकांनी त्या दुकानदारालाही मारहाण केली. हा सर्व प्रकार पाहताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली आणि या पर्यटकांना पकडले.
यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवत हुज्जत घालणाऱ्या पर्यटकांना पोलिस ठाण्यात नेले. धिंगाणा घालणार्या पर्यटकांवर गुन्हा दाखल केला आहे.
या परिसरात येणार्या पर्यटकांवर बंदी येणे गरजेचे आहे. कोरोनाच्या काळात पर्यटनाला येणार्यां पर्यटकांमुळे या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
Post a Comment