कांदा व डाळिंबाचे भाव...


राहाता : येथील बाजार समितीत सोमवारी  कांद्याची 15 हजार 652 गोण्यांची आवक झाली.  भाव मात्र स्थिर आहेत.

राहाता बाजार समितीत 15 हजार 652 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 2200 रुपये भाव प्रतिक्विंटल मिळाला. 

कांद्याचे भाव प्रति क्विंटलमध्ये एक नंबर कांदा : 1600 ते 2200, दोन नंबर कांदा : 1050 ते 1550, तीन नंबर कांदा :500 ते 1000, गोल्टी कांदा : 1200 ते 1500, जोड कांदा : 100 ते 500

शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन राहाता बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. डाळिंबाच्या भावात आज घसरण झाली आहे.

राहाता बाजार समितीत डाळिंबाची 16 हजार 325 क्रेटसची आवक झाली. यामध्ये डाळिंबाला सर्वाधिक 110 रुपये किलोचा भाव मिळाला.

बाजार समितीचे किलोमध्ये डाळिंबाचे भाव : एक नंबर डाळिंब : 76 ते 110, दोन नंबर डाळिंब : 51 ते 75, तीन नंबर डाळिंब : 26 ते 50, चार नंबर डाळिंब : अडीच रुपये ते 25 रुपये किलो दराने विक्री झाली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post