सुनेने सासूच्या अंगावर ओतले गरम पाणी


भंडारा :
 सोन्याची अंगठी करुन दिली नाही, म्हणून सुनेने सासूच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही घटना भंडारा शहरात घडली. जखमी झालेल्या वृध्द महिलेवर रुग्णालयात उपचार सुुरु आहेत. या घटनेमुळे मात्र भंडारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. सोन्यापायी सासूला त्रास दिल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

सासूने स्वतःसाठी सोन्याची नवीन अंगठी केली. मात्र आपल्या मुलाला अंगठी न करुन दिल्याने सासू  व सुनामध्ये वाद झाला होता. सुनेने आंघोळीसाठी गरम केलेले पाणी चक्क सासूच्या अंगावर ओतले. ही धक्कादायक घटना भंडारा शहरातील रामनगरातील किसान चौकात घडली आहे.

या घटनेत सासू गंभीररित्या जखमी झाली असून सुनेविरुद्ध भंडारा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पा ओमप्रकाश गभने (वय 65 वर्ष) असे जखमी सासूचे नाव असून अलका अरविंद गभने (वय 37 वर्ष) असे आरोपी सुनेचे नाव आहे.

भंडारा शहर पोलिसांनी आरोपी सुनेच्या विरुद्ध कलम 324, 504, 506 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post