अमर छत्तीसे
श्रीगोंदा : रस्त्याच्या वादातून घारगाव येथे दोन गटात राडा झाला. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या हाणामारीत मात्र गज, काठी, दगड, मिरची पूड असा शस्रांचा वापर करण्यात आलेला आहे.
जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घारगाव येथे घडली. या हल्ल्यामध्ये पानसरे यांच्यासह दोघे जखमी झाले आहे. या जखमींवर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेत पानसरे पती, पत्नीविरुद्धही गुन्हा दाखल झालेला आहे.
घारगाव येथे रस्त्याच्या वादातून पानसरे व परदेशी या दोन्ही कुटुंबात वाद सुरू होते. या वादाचे रुपांतर 26 सप्टेंबरला हाणामारी झाली.
यात परदेशी कुटुंबाने रिवाल्वर, तलवार , कोयता, लोखंडी गज, दगड , मिरचीपूडचा वापर करत आपल्यावर हल्ला केल्याचे दत्तात्रय पानसरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रमेश परदेशी, शिवाजी परदेशी, नारायण परदेशी यांच्यासह 15 ते 16 जणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान याच मारामारी दत्तात्रय पानसरे व त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना पानसरे, महेश पानसरे , सुनील पानसरे , किसन पानसरे , राधाबाई पानसरे यांनी गजाच्या साहाय्याने आपल्यावर हल्ला करुन जखमी केल्याची फिर्याद शुभम परदेशी यांनीही बेलवंडी पोलिसात दाखल केलेली आहे .
या प्रकरणी दोन्ही गटाने परस्परविरोधी फिर्यादी दाखल झालेल्या असून पोलिस तपास सुरु आहे.
Post a Comment