कर्जत : उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह त्यांचे सहकारी नगरसेवक यांनी मुबंई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, आ रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. राऊत यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.
मागील आठवड्यातच भाजपाच्या प्राथमिक आणि सक्रिय सदस्यपदाचा राजीनामा देत अप्रत्यक्षरीत्या आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी दिले होते.
गुरुवार, दि २३ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आ रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सुभाष गुळवे, नितीन धांडे यांच्या उपस्थितीमध्ये राऊत यांनी अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राऊत यांच्यासह गुरुवारी नगरसेविका उषा मेहेत्रे-राऊत, हर्षदा काळदाते, नगरसेवक पुत्र सतीश समुद्र, नगरसेविका पती किरण पाटील, ठेकेदार मंगेश नेवसे, अमृत काळदाते, रामदास हजारे, बजरंग कदम, इरफान सय्यद, दीपक ननवरे, महादेव खंदारे, उमेश जपे, युनूस पठाण, धनंजय थोरात, भाऊ पोटरे, मनोज आल्हाट, बबलू साखरे, कैलास बनकर, अभिजित गिरी आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राऊत यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाले आहे.
मागील वेळी कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ शून्य होते. मात्र सध्या कर्जत- जामखेड मतदारसंघात आ रोहित पवार यांच्या विकास कामाने प्रभावित होत अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होत असल्याने राजकीय ताकद वाढली आहे.
यावेळी शहर राष्ट्रवादीचे सुनील शेलार, युवकचे प्रा विशाल मेहेत्रे, प्रसाद ढोकरीकर, अमृत काळदाते, नितीन तोरडमल, माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, रज्जाक झारेकरी, दीपक शिंदे, लाला शेळके, रवी पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment