पारनेर ः महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांच्या गैरव्यवहार प्रकरणांची पोलखोल करणाऱे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पारनेरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सोमय्या यांचा सत्कार केला.
किरीट सोमय्या जिल्हा दौर्यावर आलेले आहेत. त्यांनी आज पारनेरमध्ये भेट दिली. या वेळी त्यांचे भाजपातर्फे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, सरचिटणीस दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक, सुभाष दुधाडे, सुनील थोरात, बाळासाहेब भेगडे आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या गैरव्यवहा करणांची सोमय्यांनी पोलखोल करून त्यांना जेरीस आणलेले आहेत. त्यामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आलेले आहेत. त्यांची धास्ती अनेकांनी घेतलेली आहे. आता त्यांचा नगर जिल्हा दौरा गैरव्यवहार करणाऱ्यांना धडकी भरवणारा ठरला आहे.
पारनेर साखर कारखान्याच्या विक्रीबाबत आवाज उठविण्याची विनंती कारखाना बचाव कृती समितीने केली होती. कृती समितीने इडीकडेही तक्रार केली आहे. या अनुशंगाने कारखाना विक्रीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी सोमय्या पारनेरमध्ये दाखल झाले. जिल्हा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचे स्वागत केले. या वेळी सोमय्यांचा जयजयकार केला.


Post a Comment