नेवासा ः नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव बाजार समितीत बुधवारी कांद्याची चांगली आवक होऊन भावही कांद्याला चांगला मिळाला. त्यामुळे शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता.
घोडेगाव उपबाजारमध्ये कांद्याच्या 46 हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक भाव 2200 रुपये मिळाला होता. काही कांद्याच्या वक्कलला 2500 ते काहींना 2700 रुपयांचा भाव मिळाला.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 1900 ते 2200, दोन नंबर कांदा ः 1700 ते 1900, मध्यम कांदा ः 1400 ते 1600, गोल्टी कांद्यास एक हजार ते दीड हजार व जोड कांद्यास चारशे ते सहाशे रुपयांचा भाव मिळाला.

Post a Comment