राहाता ः राहाता बाजार समितीत कांद्याच्या सुमारे पाच हजार कांदा गोण्यांची आज (गुरुवारी) आवक झाली. एक नंबर कांद्याच्या भावात बुधवारपेक्षा आज गुरुवारी 200 रुपयांनी वाढ झाली. गेल्या अनेक दिवसातील हा विक्रमी भाव ठरला आहे.
राहाता बाजार समितीत कांद्याच्या पाच हजार 308 कांदा गोण्यांची आवक झाली. बुधवारी एक नंबर कांद्याला 2100 रुपये बाव मिळाला होता. आज त्यात 200 रुपयांनी वाढ होत 2300 रुपये क्लिंटलचा भाव मिळाला.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 1800 ते 2300, दोन नंबर कांदा ः 1250 ते 1750, तीन नंबर कांदा ः 600 ते 1200, गोल्टी कांदा ः 1300 ते 1600, जोड कांदा ः 100 ते 600.
बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी प्रतवारीनुसार झालेली वाढ अशी झाली आहे. एक नंबर कांद्याच्या भावात 200 रुपयांनी वाढ झालेली आहे. तसेच कमीत कमी एक नंबर कांद्याच्या भावात 100 रुपयांची वाढ झाली आहे. दोन नंबरच्या कमीत व जास्तीत जास्त भावात 100 रुपयांची वाढ झालेली आहे. तीन नंबर कांद्याच्या भावात कमीत कमी व जास्तीत जास्तमध्ये 100 रुपयांची वाढ झाली आहे. गोल्टी कांद्याच्या भआवात कमीत कमी व जास्तीत जास्त 100 रुपयांची वाढ जालेली आहे. जोड कांद्याच्या जास्तीत जास्त भावात 100 रुपयांची वाढ झालेली आहे. कमीत कमी भाव मात्र स्थिर आहेत.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कांद्याला आणखी भाव मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या संचालक मंडळासह सचिवांनी केले आहे.

Post a Comment