अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या... मनसे आक्रमक...


पाथर्डी ः
तालुक्यातील माणिकदौंडी व परिसरातील जाटदेवळे, पिरेवाडी, बोरसेवाडी, चितळवाडी, लांडकवाडी, आल्हनवाडी, पत्र्याचातांडा, धनगरवाडी, चेकेवाडी, घुमटवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे संपूर्ण पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या नेत्तवाखाली माणिकदौंडी येथे तीन तास बैठा सत्याग्रह आंदोलन केले.

या आंदोलनात मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ,संदीप काकडे, उपजिल्हाध्यक्ष आर. के. चव्हाण, उपतालुकाध्यक्ष अशोक आंधळे, विभागाध्यक्ष सुनील पवार, मल्हारी डमाळे, भैरवनाथ डमाळे, विनोद गव्हाणे, माणिकदौंडीचे सरपंच समीर पठाण, चितळवाडी सरपंच संजय चितळे, घुमटवाडीचे सरपंच अशोक चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश चितळे, महादेव डमाळे, महादेव आघाव, अर्जुन पाखरे, दशरथ पोमन, शिवा पाखरे, आजिनाथ डमाळे, विजय आघाव  आदी सहभागी झाले होते.

भ्रमणध्वनीवरून आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती आधिकाऱ्यांनी केली. मात्र अधिकारी येणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा पालवे यांनी घेतल्यानंतर नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, मंडलाधिकारी, तलाठी आंदोलनस्थळी दाखल झाले.

पालवे म्हणाले की, या भागातील जनता ही कष्टकरी आहे मागील वर्षी देखील फक्त पंचनामे झाले मदत मात्र अजून मिळाली नाही. याही वर्षी अतिवृष्टी होऊन महीना झाला तरी अजून संपूर्ण पंचनामेच नाहीत. प्रशासन एवढे ढिम्म कसे आहे, असा प्रश्न उपस्थित केला. 

यावर तहसीलदार भानुदास गुंजाळ यांनी मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांची त्रिसदस्यीय समिती करून माणिकदौंडी परिसरातील वरील सर्व गावातील संपूर्ण पंचनामे आठवडाभरात पुर्ण करून त्यानंतर शासनाकडून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post