बुलढाणा ः सोन्याच्या हव्यासपोटी सुनेने सासूच्या अंगावरुन दागिने ओरबाडले, तर कानाचेही लचके तोडल्याची घटना घडली आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ही थरारक घटना घडली.
लोणार तालुक्यातील भुमराळा शिवारात वृद्ध महिलेची हत्या करुन तिच्या अंगावरील दागिने लंपास केल्याची घटना समोर आली होती. कपाशीच्या शेतात 65 वर्षीय वृद्ध महिला कासाबाई चौधरी यांचा मृतदेह आढळळून आल्याने खळबळ उडाली होती. कासाबाई यांच्या अंगावरील दागिने अक्षरशः ओरबाडले होते, तर कानाचे लचकेही तोडलेले होते.
मारेकऱ्याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले. तपासावेळी पोलिसांनी खून प्रकरणात तिच्या चुलत सून नंदाबाई उद्धव चौधरी अटक केली. तिने सोने-चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी चुलत सासूचा खून केल्याचे समोर आले आहे.
आरोपी नंदाबाई व मृत कासाबाईंचे शेत शेजारी-शेजारीच आहे. 18 सप्टेंबरच्या सायंकाळी दोघीही आपापल्या शेतात काम करत होत्या. नंदाबाईने चुलत सासू कासाबाईंच्या अंगावरील दागिने मिळवण्यासाठी तिची हत्या केली. कानाचे लचके तोडून दागिने लांबवले.

Post a Comment