कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांची फक्त सर्वसामान्यांना सक्ती... नेत्यांच्या कार्यक्रमांना हजारोंची गर्दी


नगर ः
कोरोना विषाणूच्या नियमावली फक्त सर्वसामान्यांना असून प्रशासनान त्याची अंमलबजावणी जनतेकडून घेत आहे. मात्र राजकीय नेत्यांच्या होणाऱ्या कार्यक्रमांना मात्र नियमावलीतून सूट देण्यात येत असून अशा राजकीय कार्यक्रमांना हजारोंची गर्दी राहत आहे. त्यावेळी कोरोना सुट्टीवर जात आहे का असा थेट सवाल आता सर्वसामान्यांमधून केला जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात आहे. कधी आकडा वाढत आहे, तर कधी कमी होत आहे. प्रशासनाकडून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नांवर जिल्ह्यात सुरु असलेल्या राजकीय कार्यक्रमांमुळे सध्या पाणी फेरले जात आहे. 

राजकीय कार्यक्रमांना किती माणसे उपस्थित असावे, याबाबत कुठलाही नियमावली घालून देण्यात आलेली नाही. तसेच अशा कार्यक्रमांमध्ये नेत्यांनी मास्क वापरावा, असे कुठलेही निर्बंध लादले जात नाही. मात्र प्रशासनाकडून सर्वसामान्यांना मात्र कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली शिकविली जात आहे. अनेकदा सर्वसामान्यांना नियमावलीचे पालन केले जात नाही, म्हणून दंडही केले जात आहे. मात्र नेते मंडऴींच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये नियमावली पायंदळी तुडवूनही त्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने सर्वसामान्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

राजकीय कार्यक्रमांमध्ये कार्यकर्ते व समर्थकांची मोठी गर्दी केली जात आहे. यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक कार्यक्रम व सत्कार सोहळ्यानंतर नेत्यांनी आपला अहवाल पाॅझिटिव्ह आलेला असून संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन समाज माध्यमावर केलेले आहे. 

मात्र समाजात वापरताना त्यांच्याकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन होत नाही. ते पालन झाले तर स्वतःसह इतरांनाचे आरोग्य चांगले राहू शकते. त्यामुळे आता प्रशासनाने अशा राजकीय गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यास सुरवात करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post