नगर : पाथर्डी तालुक्यात घडलेल्या घरफोडीच्या घटनेतील आरोपीला नगरमध्ये अटक करण्यात आलेली आहे. पाथर्डी तालुक्यात घराच्या खिडक्या तोडून चोरीची घटना घडली होती. या चोरीतील एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
कृष्णा महादेव काशिद (वय 24, रा. शेकटे, ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी, करंजी(ता. पाथर्डी) येथे 22 जुलै 2021 रोजी दिलीप आत्मराम अकोलकर यांच्या घराची खिडकी तोडून घरात प्रवेश करीत सोन्या-चांदीचे दागिनेचोरून नेले.
याबाबत दिलीप अकोलकर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा शेकटे येथील कृष्णा काशिद याने केला आहे.
त्यानुसार पोलीस पथकाने सिद्धार्थ नगर येथे सापळा लावून कृष्णा काशिद याला पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन हजार रुपयाचा मोबाइल जप्त करण्यात आला.
ही कारवाई सपोनि गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी विश्वास बेरड, संदीप पवार, सुरेश माळी, दीपक शिंदे, रवींद्र घुंगासे, शिवाजी ढाकणे यांच्या पथकाने केल

Post a Comment