नवी दिल्ली ः पितृपंधरवडा सुरु आहे. त्यातच सोन्याच्या भावात सध्या घसरण झालेली आहे. याच संधीचा फायदा घेत काहींनी पितृपंधरवड्यात खरेदी करायची नसली तरी सोने घेण्यावर भर देण्यास सुरवात केलेली आहे. पुढे दिवाळी व दसरा असल्यामुळे सोन्याच्या भावात वा़ढ होण्याची शक्यता आहे.
सोन्याचांदीच्या दरात गेले काही दिवस चढउतार कायम पाहिला मिळत आहे. गेल्या महिनाभरात अधिक घसरण झाल्याने जवळपास 1200 रुपयांनी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याची वायदे किंमत आज 0.04 टक्क्यांनी वाढली आहे, तर चांदीचे दर 0.12 टक्क्यांनी कमी झाले आहेत.
काल सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. दुसरीकडे, जर चांदीबद्दल बोलायचे झाले तर गुरुवारी चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली, जी अलिकडच्या महिन्यांतील सर्वाधिक आहे. गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार पाहिला मिळत आहे.
दरम्यान, जर गेल्या एका महिनाभराबाबत बोलायचं झालं तर, महिनाभरात सोन्याचे दर 1,111 रुपयांनी कमी झाले आहेत. 26 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर एमसीएक्सवर 47,188 रुपये प्रति तोळा होते तर चांदीचे दर 63,192 रुपये प्रति किलोग्रॅमवर होते.
एमसीएक्सवर आज सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी वाढले आहेत. यानंतर सोन्याचे दर 46,075 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 0.12 टक्क्यांच्या घसरणीनंतर 60,714 रुपये प्रति किलोवर आहेत.

Post a Comment