दूध भेसळ अडडे उध्दवस्त...


अकोले  ः
अकोले येथे दूध केंद्रावर बनावट दूध तयार करीत असल्याची माहिती मिळाल्याने अकोले परिसरात भेसळयुक्त दूध बनविणारे दोन अड्डे पोलिस आणि अन्न व औषध प्रशानाने उध्दवस्त केले आहे. सर्व दूधसाठा उध्वस्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी पवार यांनी दिली.


याबाबत माहिती अशी की, दि.22 सप्टेंबर रोजी योगेश धोंडीभाऊ चव्हाण (रा.जांभळी रोड, शिंदेवाडी, पो.ब्राम्हणवाडा,ता. अकोले) येथील दूधसंकलन कंद्रावर बनावट दूध तयार करीत असल्याची माहिती आकेले पोलिस ठाण्याला येथे प्राप्त झाली. त्यानुसार खातरजमा होताच मिळालेल्या गुप्त माहितीवरुन अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना कळवून त्यांना बरोबर घेऊन पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांनी अकोल तालुक्यातील जांभळी रोड, शिंदेवाडी, ब्राम्हणवाडा येथे योगेश धोंडीभाऊ चव्हाण यांचे राहते घरी जांभळी रोड, मु.शिंदेवाडी, ब्राम्हणवाडा येथे योगेश धोंडीभाऊ चव्हाण याचे राहते घरी जांभळी रोड, मु.शिंदेवाडी, ब्रम्हणवाडा या ठिकाणी छापा टाकला व योगेश धोंडीबा चव्हाण याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 28 लिटर 700 रुपयांचे बनावट दूध, बनावट दूध तयार करण्यासाठी वापरलेले 15 लिटर लिक्वीड 2025/- रुपयांचे दोन प्रकाच्या पावडर 371 किलो 52,432/- रुपयांचा असा एकुण 55 हजार 720 रुपयांचे बनावट दूध बनवण्याचे साहित्य जप्त केले.

तसेच त्याचे मालकीचे मे.सघ केंद्र शिंदेवाडी, मु.जांभळे, पो.बदगी, ता.अकोले या ठिकाणी छापा टाकुन बनावट दुध तयार करणारा योगेश चव्हाण याने तयार केलेले 998 लिटर 24 हजार 950 रुपयांचे बनावट दूध, असे एकूण 80 हजार 670 रुपयांचे भेसळीचे दुध व साहित्य असा मुद्देमाल जप्त करुन त्यातुन तपासणीसाठी नमुने घेऊन राहिलेला सर्व दूध साठा नष्ट करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे सपोनि मिथुन घुगे, पोसई भुषण हांडोगे, पोना बाबासाहेब बडे, विठ्ठल शेरमाळे, रविंद्र बलवे, गोविंद मोरे, पोकॉ गणेश शिंदे, राहुल क्षिरसागर यांचेसह व अन्न व औषध प्रशासन अधिकारी पवार यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post