राहुरी ः माणसे अनेकदा रंग बदलत असतात. ज्यांना रंगबदल्याने वाईट अनुभव आला ते एकाद्याला रड्याची उपमा देऊन मोकळे होतात. माणसे रंग कितीही बदलत असले तरी पाणी मात्र कधीच आपला गुणधर्म व रंग बदलत नाही. पाण्यात रंग मिसळवल्यावर त्याचा रंग बदलत असतो. मात्र मुळा धरणातील पाण्याने आता रंग बदला असून धरणातील मोर्यातून वाहण्यारे पाणी रंगीबेरंगी दिसू लागले आहे.
राहुरी येथील मुळा पाटबंधारे विभागाकडून धरणाच्या 11 मोर्याजवळ रंगीबेरंगी दिवे बसवण्यात आल्याने धरणाचा पाणी विसर्गाचा परिसर रोषणाईने चमकण्यास मदत झाली. रंगीबेरंगी दिव्याच्या झगमगाटात मोर्यातून नदीपात्रात पडणार्या पाण्याला राष्ट्रध्वज तिरंग्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. धरणाच्या स्थापनेनंतर मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या कार्यकाळात प्रथमच हे दृश्य राहुरीकरांना पहावयास मिळाले.
कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरवड्यापासून मुळा धरणाच्या 11 मोर्याजवळ रंगीबेरंगी दिवे बसवण्याचे काम सुरू आहे. 11 पैकी 10 मोर्याच्या रोषणाईचे काम बुधवारी रात्री पूर्ण झाल्याने रात्री 9 वाजता धरणाच्या 11 पैकी 10 मोर्यातून 2 हजार 170 क्युसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.
मोर्या जवळील दिव्याच्या झगमगाटात नदीपात्रात पडणार्या पाण्याने राहुरीकरांना अक्षरक्षा मोहणी घातली. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या मुळा धरणाची संपूर्ण देशभरात ओळख आहे.
धरणावर जिल्ह्यातील 9 प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तसेच राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील कृषी सिंचन अवलंबून असल्याने मुळा धरणाला नगर जिल्ह्याची वरदायीणी म्हणून ओळखले जात आहे.

Post a Comment