मुंबई : कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी मोठी राजकीय उलथापालथ केली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांचे समर्थक असलेले कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत अखेर राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नामदेव राऊत यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार रोहित पवार, रजाक झारेकरी, प्रसाद ढोकरीकर,सुभाष गुगळे, नितीन धांडे, लालासाहेब शेळके, रवी पाटील, नितीन तोरडमल आदी उपस्थत होते.
कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, हर्षदा काळदाते, अमृत काळदाते, उषा राऊत, इरफान सय्यद, रामदास हजारे, बजरंग कदम, दीपक ननवरे, महादेव खंदारे यून्सूस पठाण, मंगेश नेवसे, धनंजय थोरात आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.




Post a Comment