राहात्यात कांद्याचे भाव स्थिर


राहाता ः
राहाता बाजार समितीत कांद्याच्या सुमारे सहा हजार कांदा गोण्यांची  काल (गुरुवारी) आवक झाली. एक नंबर कांद्याला 1800 प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. कांद्याचे भाव स्थिर होते.

 
राहाता बाजार समितीत कांद्याच्या पाच हजार 920 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 1800 रुपयांचा भाव मिळाला होता.

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 1400 ते 1800, दोन नंबर कांदा ः 850 ते 1350, तीन नंबर कांदा ः 400 ते 800, गोल्टी कांदा ः 1100 ते 1300, जोड कांदा ः 100 ते 400.

कांद्याला मागणी की झालेली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भावावर होत आहे. कांद्याला मागणी वाढल्यानंतर भाव वाढ होईल, अशी आशा सर्वांना लागलेली आहे. गुरुवारी गोल्टी कांदयाच्या भावात मात्र घसरण झालेली आहे.
शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या संचालक मंडळासह सचिवांनी केले आहे.

राहाता बाजार समितीत डाळिंबाची दहा हजार 153 क्रेडस आवक झाली. एक नंबर डाळिंबाला अवघा 175 रुपये किलोचा भाव मिळाला.

प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर डाळिंब ः 121 ते 175, दोन नंबर ः 81 ते 120, तीन नंबर ः 41 ते 80, चार नंबर ः अडीच ते 40 रुपये किलो दराने विक्री झाला. डाळिंबासह कांद्याची प्रतवारी करून शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post