पाथर्डी ः कपडे सुकायला टाकत असलेल्या पत्नीला विजेचा शॉक बसल्याने ती जोरात ओरडली. त्यामुळे मदतीसाठी गेलेल्या पतीला देखील विजेच्या जबर धक्का बसून पती-पत्नीचा मृत्यू झाला.
ही
दुर्दैवी घटना पाथर्डी तालुक्यातील सांगवी खुर्द येथील सांगवी-साकेगाव
रस्त्यावरील कटारनवरे वस्तीवर घडली. शोभा मच्छिंद्र कटारनवरे व मच्छिंद्र
कोडींबा कटारनवरे असे या घटनेत मृत झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगवी खुर्द येथील कटारनवरे वस्तीवर शोभा मच्छिंद्र कटारनवरे (वय 40 वर्षे) या धुणे वाळायला टाकत होत्या. त्यावेळी त्यांना विजेचा शॉक बसल्याने त्या जोरात ओरडल्या. त्यामुळे त्यांचे पती मच्छिंद्र कोंडीबा कटारनवरे (वय 43 वर्षे) हे त्यांच्या मदतीला धावले.
मात्र, या दोघांनाही विजेचा शॉक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सांगवी गावावर शोककळा पसरली. या दाम्पत्यावर गावातच अंतिम संस्कार करण्यात आले. कटारनवरे यांचा मुलगा होमगार्डमध्ये जवान म्हणून काम करीत आहे.

Post a Comment