श्रीगोंदा
ः कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी भाजपाला सोडचिठ्ठी
दिल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीमध्ये कधी प्रवेश होणार आहे, याची उत्सुकता
सर्वांना लागली होती. काहींनी प्रवेशाच्या तारखाही बोलून दाखविल्या होत्या.
मात्र या सर्व तारखा चुकीच्या ठरलेल्या असून गुरुवारी (दि. 23)ला नामदेव
राऊत राष्ट्रवादीत प्रवेष करणार आहेत.
नामदेव राऊत यांनी भाजपाला
सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित
होते. मात्र त्यांचा प्रवेश कधी होणार याचीच सर्वांना उत्सुकता लागलेली
हाेती. राऊत यांच्याबरोबर आता किती जण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार याची
उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. राऊत यांच्याबरोबर कर्जतमधील पाच ते सहा
नगरसेवक व काही पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या
चर्चा आहे. या चर्चेला उद्या प्रवेश सोहळा पार पडल्यानंतर पूर्ण विराम
मिळणार आहे.
हा प्रवेश सोहळा मुंबईतमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या उपस्थित होणार आहे. या वेळी आमदार रोहित पवार यांच्यासह कर्जत
तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राऊत
यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची कर्जतमधील आता ताकद वाढलेली आहे. मागील
नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला खातेही उघडता आलेले नव्हते. मात्र आता
राऊत यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादीला कर्जत नगरपंचायतमध्ये
निर्वावाद वर्चस्व मिळविता येणार आहे. मागील निवडणुकीत राऊत यांच्यामुळेच
भाजपाला नगरपंचायतीवर वर्चस्व मिळविता आले होते.

Post a Comment