सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी नोकरीला लागणे भाग्य...माजी सरपंच देवराव वाकडे

श्रीगोंदा : अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील व ग्रामीण भागातील दोन विद्यार्थांची पोलीस दलात निवड होणे हे त्या कुटुंबाचे भाग्यच आहे, असे प्रतिपादन आढळगावचे माजी सरपंच देवराव वाकडे यांनी केले.


आढळगाव येथे आयोजित पोलिस दलात भरती झालेल्या दोन विद्यार्थांच्या आयोजित सत्कार समारंभात बोलताना केले. 

श्रीगोंदा येथील ऋषिकेश घोडके व शेडगाव येथील किरण धेंडे  या दोन विद्यार्थांची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आढळगाव ग्रामस्थ  व ABCD INSTITUTE या अभ्यासिकेच्या वतीने आढळगाव येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

वाकडे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांना वेळीच योग्य दिशा मिळाली तर त्याचा निश्चितच भविष्यात फायदा होतो. धेंडे व घोडके या दोन मुलांनी अतिशय कष्टातून यश मिळविले आहे. या यशातून त्यांच्या कुटुंबाचे भाग्यच उजळणार आहे, असे वाकडे म्हणाले. 


यावेळी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष देवराव शिंदे, संचालक तात्यासाहेब डोके, शिवदास शिंदे, सोपान गव्हाणे, माजी उपसरपंच बापुराव जाधव, प्रगतशील बागायतदार बाळासाहेब शिंदे, उद्योजक संदिप सुर्यवंशी, पत्रकार शरद शिंदे, अमोल सोनवणे, प्रशांत अडागळे, गणेश चव्हाण, किरण शिंदे, विकास शिंदे, ईश्वर मेहेत्रे, शरद गव्हाणे, संतोष सोनवणे, भाजपाचे सतीश काळे, विष्णुपंत बोळगे, पप्पू शिंदे, यश शिंदे आदी उपस्थित होते. 

या यशस्वी विद्यार्थ्यांना कौटिल्य करिअर अकॅडमीचे संचालक प्रा. संतोष धुमाळ, शिक्षक प्रा. धुमाळ, प्रा. कृष्णा सावंत, प्रा. सुदर्शन रामफुले, प्रा. राहुल मेहेत्रे, मैदानी शिक्षक नितीन जमदाडे, मार्गदर्शक गणेश बडे, प्रवीण मखरे, अमोल सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post