नवी दिल्ली ः केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार खूशखबर देणार आहे. आता कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे. त्याबरोबरच कोरोनामुळे सरकारने दीड वर्षांपर्यंत महागाई भत्ता दिलेला नव्हता. तो आता मिळणार असून 17 टक्क्यांवरून तो 28 टक्के केला आहे.
ऑगस्ट महिन्यात सरकारने घरभाडे भत्ता तीन टक्के वाढवून मूळ वेतनाच्या 25 टक्के केली आहे. केंद्र सरकारने आदेश जारी करताना म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर घरभाडे भत्ता आणि डीए वाढवण्यात यावा. नियमांनुसार, घरभाडे भत्ता वाढविण्यात आले आहे. कारण डीए 25 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या कारणास्तव, केंद्र सरकारने घरभाडे भत्ता वाढवून 27 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
सात जुलै 2017ला विभागाने एक आदेश जारी केला होता त्यामध्ये म्हटले होते की जेव्हा डीए 25 टक्के पेक्षा जास्त असेल तेव्हा घरभाडे भत्त्यामध्ये देखील सुधारणा केली जाईल. एक जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे आता घरभाडे भत्त्यामध्ये देखील सुधारणा करणे आवश्यक आहे.
शहराच्या श्रेणीनुसार 27 टक्के, 18 टक्के व 9 टक्के एचआरए दिले जात आहे. ही दरवाढ डीएसह एक जुलै 2021 पासून लागू झाली आहे. घर भाडे भत्त्याची श्रेणी एक्स, वाय अन् झेड वर्ग शहरांनुसार आहे.
याचा अर्थ असा आहे की, केंद्रीय श्रेणीतील जे एक्स वर्गात येतात त्यांना आता दरमहा 5400 रुपयांपेक्षा जास्त घरभाडे भत्ता मिळेल. यानंतर, वाय वर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा 3600 रुपये आणि नंतर झेड वर्गातील कर्मचाऱ्यांना 1800 रुपये दरमहा मिळतील.
सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे किमान मूलभूत वेतन 18,000 रुपये आहे. सध्या, खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15000 रुपयांपासून सुरू होते. 18,000 रुपयांच्या या मूळ पगारावर, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जून 2021 पर्यंत 17 टक्के दराने 3060 रुपये डीए मिळत होता. जुलै 2021 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 28 टक्के डीए दराने 5040 रुपये दरमहा मिळतील. आता कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 1980 रुपयांनी वाढले.
आता केंद्राला महागाई भत्ता वाढल्यामुळे राज्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. केंद्राने कसा घरभाडेभत्ता वाढवला किती महागाई भत्ता दिला व राज्य सरकार आपल्याला किती देईल, याची आकडेमोड राज्याचे कर्मचारी करीत आहेत.
Post a Comment