मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने एसटी महामंडळासोबत झालेल्या यशस्वी चर्चेअंती आपले आंदोलन २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेतले आहे. २९ ऑक्टोबरला काही आगारामध्ये नियमबाह्य आंदोलन, संप, निर्देशने सुरू आहेत.
याबाबत एसटी महामंडळाने औद्योगीक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेवर अंतरिम आदेश देत असताना, औद्योगिक न्यायालयाने संबंधित आंदोलने, संप, निर्देशने बेकायदेशीर ठरवले आहे.
प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत. हा आदेश एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू आहे. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने आपल्या कामांवर हजर व्हावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment