नगर ः कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत 50 हजाराची रोकड लांंबविल्याची घटना केडगाव इंडस्ट्रियल परिसरात दि. 30 रोजी दुपारी दोन वाजता घडली. याप्रकरणी लखन कावळे, साई ठोसर, कुणाल भालेराव या तिघांविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी उद्धव विठ्ठल पवार (वय 50, रा. अयोध्यानगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार यांना आरोपींनी चापटीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील 50 हजाराची रक्कम काढून घेतली व जीवे मारण्याची धमकी देत तेथून पलायन केले.
पवार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि रणदिवे करीत आहेत.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या घटनेतील आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
Post a Comment