कारागृहात हाणामारी..

श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या आवारातील दुय्यम कारागृहातील कैद्यांमध्ये भांडण होऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या शरद भदे याला पाच ते सहा आरोपींनी संगनमत करून बेदम मारहाण केली आहे.


या मारहाणीत भदे याला जबर दुखापत झाली आहे. त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.

श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या दुय्यम कारागृहाची क्षमता 40 कैद्यांची आहे. या ठिकाणी न्यायालयीन तसेच पोलिस कोठडी सुनावलेले सुमारे 80 कैदी आहेत. त्यामुळे या कैद्यांना पुरेशी जागा मिङ्घत नसल्याने त्यांच्यात वेळोवेळी तक्रारी होत असतात. 

त्यातच बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास न्यायालयीन कोठडीत असलेल्या शरद भदे याला पाच ते सहा आरोपींनी संगनमत करून बेदम मारहाण केली.

या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या नाकाला देखील दुखापत झाली असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार भैलुमे यांनी स्टेशन डायरीला नोंद केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post