पारनेर : तालुक्यातील अवैध दारुधंद्यावर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यामध्ये सुमारे पावणे दोन लाखाचा दारुसाठा जप्त करुन सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पारनेर तालुक्यात विशेष मोहिम राबवून एक व दोन ऑक्टोबरला या दोन दिवसाच्या कालावधीत पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले.
या छाप्यामध्ये एक लाख ७० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये देशीविदेशी, ताडी, गावठी हातभटटीची दारु जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत सहा आरोपी विरुध्द पारनेर पोलिस ठाण्यात खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
संतोष मधुकर साळवे (वय ४२ रा. ढवळपुरी ता. पारनेर) याला अटक करून त्याच्याकडून ४० लिटर ताडीचा चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सीताराम विधाटे (वय २१ रा. वणकुटे ता. पारनेर) याला अटक करून त्याच्याकडून देशी विदेशी दारुचा चा हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पंडा रामभाऊ खंडवे (वय ३० रा. पळसी ता. पारनेर), दत्तात्रय तिकोले (रावणकुटे ता. पारनेर) या दोघांना अटक करून त्याच्याकडून देशी विदेशी दारु १ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नितीन मारुती साळवे (वय ४५ रा. पळसी ता. पारनेर ) याला अटक करून त्याच्याकडून देशी विदेशी दारु१ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संभाजी बिटटल गव्हाणे ( रा. म्हसे ता. पारनेर) याला अटक करून त्याच्याकडून १ लाख ६० हजाराचा गावटी हातभटटीची तयार दारु, कच्चे रसायन असा मुद्देमाल जप्त केला आहे.
Post a Comment