नगर : जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर जिल्ह्यामध्ये सध्या पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. या मोहिमेत कोतवाली पोलिसांनी एका आरोपीच्या कब्ज्यातून दोन तलवारी जप्त केल्या आहेत.
दीपक सुरेश बेर्हाडे (वय 23 वर्ष, रा. सारसनगर, मार्केट यार्ड, त्रिमूर्ती चौक) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
जिल्ह्यातील पोलिसांनी फरार व सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी विविध प्रकारच्या कारवाया सुरू केल्या आहे. मार्केट परिसरामध्ये एक व्यक्ती तलवारीने दहशत करत आहे, अशी खबर मिळाली असल्याने त्याचा पोलिस शोध घेत होते.
कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने रात्रीचा सुमाराला मार्केट यार्ड परिसरामध्ये सापळा रचून या आरोपीस ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याच्या कब्ज्यातून दोन तलवारी हस्तगत केल्या आहे. पकडलेल्या आरोपी विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी दोन गुन्हे दाखल आहेत व अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई कोतवाली पोलिस ठाण्याचे जी. टी. इंगळे, विष्णू भागवत, अभय कदम, नितीन गाडगे, प्रमोद लहारे, सुमीत गवळी, दीपक रोहकले, सुशील वाघेला यांच्या पथकाने केली.
Post a Comment