श्रीगोंदा : तालुक्यातील आनंदवाडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच वर्षाराणी सुभाष खोडवे यांनी राजीनामा दिल्यानंतर गणेश गिरमकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
तालुक्यातील आनंदवाडी हे गाव आढळगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य पंचशीलाताई गिरमकर यांचे गाव आहे. स्थानिक राजकारणात शब्दाला किंमत असते.
याच शब्दाची जाणीव ठेवून विद्यमान उपसरपंच वर्षाराणी सुभाष खोडवे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आता गणेश (विकी) गिरमकर यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर आढळगाव गटाचे युवा नेते रमेश गिरमकर यांनी नुतन उपसरपंचांचा सत्कार केला.
Post a Comment