कर्जत : निसर्गाशी नाळ जोडली तरच पुढील आयुष्य निरोगी असेल यासाठी पर्यावरण संवर्धनाला भावी आयुष्यमध्ये अनन्यसाधारण महत्त्व द्यावे लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अटल पणन अभियानाचे मुख्य व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले आहे.
कर्जत येथे सर्व सामाजिक संघटना व कर्जत नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदान चळवळीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी स्टार प्रवाहवरील मालिका आई कुठे काय करते यातील अभिनेत्री गौरी कुलकर्णी, कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार, माजीमंत्री प्रा. राम शिंदे प्रांताधिकारी तथा कर्जत नगरपंचायत प्रशासक डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, सार्वजनिक बांधकामचे अमित निमकर, वनविभागाचे सागर केदार, बारामती अग्रीकल्चरल डेव्हलपमेंटच्या विश्ववस्त सुनंदाताई पवार, बारामती अँग्रोचे राजेंद्र पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार, सहकार क्षेत्रातील आदी उपस्थित होते.
गणेश शिंदे म्हणाले की भविष्यात जर निरोगी जगायचे असेल तर निसर्गाशी नाळ जोडावी लागेल आणि वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असेल आज भौतिक सुखाने माणूस त्रस्त झालेला आहे त्याला सुखी आणि समाधानी ठेवण्यासाठी निसर्गच मदत करू शकतो असे शिंदे म्हणाले.
अभिनेत्री गौरी कुलकर्णी म्हणाले की, कर्जतमध्ये सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्वच्छता आणि निसर्ग संवर्धनाच्या कार्यक्रमामुळे आपण भारावून गेलो आहे अशीच मोहीम गावागावात जर सुरू राहिली तर निश्चितच गावातील चित्र बदललेले दिसेल.
माजीमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुरु असलेल्या स्वच्छता आणि निसर्ग संवर्धन या कार्यामुळे कर्जतकरांचे नाव निश्चितच राज्य आणि देशपातळीवर जाईल यात शंका नाही. या अभियाना बरोबर आपणही जोडलेले आहोत राहू असे यावेळी शिंदे म्हणाले.
रोहित पवार म्हणाले की, कर्जत शहर आणि परिसराचे नाव उंचावण्यासाठी कर्जत येथे सर्व सामाजिक संघटनांचे सर्व स्वयंसेवकांनी केलेले कष्ट निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. भविष्यात कर्जतचे नाव उंचावण्यासाठी आपणही अभियाना बरोबर निश्चित राहू या अभियानासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. असे आमदार रोहित पवार म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सर्व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी तथा निवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांनी वर्षभर सामाजिक संघटनेने केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला.
यावेळी या कार्यक्रमाला समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महावृक्षारोपण कार्यक्रमात एकाच वेळी सहा हजार झाडे लावण्याचा विक्रम नोंदण्यात आला. या अभियानात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
कर्जत शहरातून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे वर्षपूर्ती निमित्त या अभियानात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी अनेकांनी रोख स्वरूपात मदत जाहीर केली.
सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या अभियानाला एक वर्ष पूर्ण झाली असून यावेळी तीन दिवसीय भरगच्च असे कार्यक्रम घेण्यात आले आहे. यात ३० सप्टेंबर रोजी शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यात लहान-मोठ्या ४८० सायकल प्रेमींनी सहभाग नोंदवला आहे. यात लकी ड्रॉ द्वारे चार भाग्यवंतांना सायकल बक्षीस देण्यात आले आहे. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने कर्जत शहरात हेस्टॅक द्वारी व्हर्च्युअल श्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment