नगर : जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकाच्या त्रासाला महिला शिक्षिका कंटाळल्या आहेत. रोजच्या त्रासातून सुटका करून घेण्याचा निर्धार या शिक्षिकेंनी एकत्र येऊन केला असून त्याबाबत थेट तक्रार गटशिक्षणाधिकार्यांकडे केली आहे. आता त्यांच्याकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक व शिक्षिका कार्यरत आहे. याच शाळेतील एका शिक्षकाच्या कार्यपध्दतीवर इतर महिला शिक्षिकेंनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्याकडून होणार्या नेहमीच्या अपमानास्पद वागणुकीला शिक्षिका कंटाळलेल्या आहे.
रोजच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी सर्व शिक्षिकेंनी एकत्र येत त्या शिक्षकाविरोधात तक्रार करण्याचा निर्धार केला. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत थेट गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्याबाबत तक्रार दाखल केली आहे. संबंधितावर त्वरीत कारवाई करा अन्यथा आम्ही सामुदायिक रजेवर जाऊ असा इशारा संबंधित शिक्षिकेंनी दिला आहे.
या प्रकरणाची गटशिक्षणाधिकारी यांनी गांभिर्याने तक्रारीची दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषावर कारवाई करण्याचे आश्वासन संबंधित शिक्षिकेंनी वरिष्ठ अधिकार्यांकडून देण्यात आल्याची चर्चा सध्या शिक्षकांच्या वर्तुळात सुरु आहे.
नगर तालुक्यातील एका शाळेत शिक्षकाच्या कृत्याने शिक्षकांची मान शरमेने खाली गेलेली असतात. त्यातच आता शिक्षकाकडून महिला शिक्षकांना होणार्या त्रासाची जिल्हा भर चर्चा सुरु झालेली आहे. त्यामुळे शिक्षकांची बदनामी होत असून अशा शिक्षकांनी कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.
Post a Comment