अकोले : अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या 1830 गोण्यांची आवक झाली. कांद्याला आज तीन हजाराच्या पुढे भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी खूश झालेले आहेत.
अकोले बाजार समितीत आदी 1830 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला 3111 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबर कांदा : 2751 ते 3111, दोन नंबर कांदा :2051 ते 2751, तीन नंबर कांदा : 1451 ते 2051, गोल्टी कांदा 1551 ते 2100, खाद 450 ते 950 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला.
अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळवून, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात आणावा.
जार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करणे, नाकाला व तोंडाला मास्क लावणे, बाजार आवारात कुणीही थुंकू नये, सामायिक अंतर राखणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.
Post a Comment