रस्त्याने प्रवास करताना रस्ते, पिके व विकासाची परिस्थिती पहायला मिळते


नगर ः
रस्ते, पिके व विकासाची परिस्थिती पहायला मिळते. त्यामुले शक्यतो रस्त्याने प्रवास करतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

नगर जिल्ह्यातील विविध चार महामार्गांचे भूमिपूजन आणि चार महामार्गांचे लोकार्पण आज करण्यात आले.  या कार्यक्रमामुळे शरद पवार आणि नितीन गडकरी एकत्र आले होते.

यावेळी विचारपीठावर पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, प्रा.राम शिंदे, बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, आमदार अरुण जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, शिवाजीराव कर्डिले आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती देण्याचे काम गडकरी करत आहेत. अन्य राज्यात रस्त्याने प्रवास करताना जेव्हा लोक भेटतात, तेव्हा ते गडकरी यांची कृपा असल्याचे सांगतात. गडकरी कामं मंजूर करताना राजकारण पाहत नाहीत, मागणी काय आहे ते पाहतात. त्यामुळं सर्व पक्षाच्या लोकांची कामे होतात. इतर कार्यक्रमाला गेलं की वर्षानुवर्षे काही बदल दिसत नाही. पण गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत फरक दिसतो. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येते, असेही ते म्हणाले. 

आपल्याला रस्त्याने प्रवास करायला आवडत असल्याचं सांगितले आहे देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावं लागतं. वाहनाने प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो. कारण त्यामुळे रस्ते बघायला मिळतात, आजूबाजूच्या शेतातले पीक बघायला मिळते. म्हणून मी शक्यतो रस्त्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करतो, असे शरद पवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post