लोकमान्यता मिळाल्यानेच आमदार निलेश लंके जनतेचे नेते

पारनेर : संघर्ष करणारी दोन माणसं एकत्र आली तर त्यांना एकमेकांविषयी माया वाढते. आपलीच एक प्रतिकृती सामान्य माणसांसाठी लढते याचा मला सार्थ अभिमान आहे. मी मंत्रालयात असो वा परळीत मला आ लंके यांच्या कामाचे कौतुक वाटते. असे सांगतानाच आ. लंके यांना लोेकमान्यता मिळाल्यानेच त्यांना सर्वजण नेेते म्हणून संबोधतात असे राज्याचे विधी व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.


वाडेगव्हाण येथील ७ कोटी ७९ लाख रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भुमिपुजन तसेच लोकार्पण मंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार दादाभाऊ कळमकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

यावेळी आमदार  नीलेश लंके, अशोक सावंत, बाबाजी तरटे, उध्वव दुसुंगे, सुदाम पवार, सुरेश धुरपते, सुनंदा धुरपते, राजश्री कोठावळे, पुनम मुंगसे, विक्रम कळमकर, जितेश सरडे, विजय औटी, किशोर यादव, श्रीकांत चौरे , विशाल आहेर, अतुल लोखंडे, नीलेश लटांबळे, किरण पठारे, सोमनाथ वाखारे, सरपंच बाळासाहेब सोनवणे, उपसरपंच रवी शेळके, डॉ. मच्छिंद्र नरवडे, जालींदर तानवडे, भानुदास घनवट, अरूण घनवट, प्रमोद घनवट, राजेंद्र शेळके, उध्दव शेळके, योगेश रासकर, अमोल यादव, यादववाडीच्या सरपंच मिना यादव आदी उपस्थित होते.  

मुुंडे म्हणाले, आ. लंके यांच्या पक्षप्रवेशाला मी उपस्थित होतो. जिवनात मी अनेक सभा पाहिल्या मात्र लंके यांच्या प्रवेशाची सभा नेहमीच स्मरणात राहील. कार्यक्रमास उत्स्फूर्त गर्दी, सभेला येण्यासाठी कोणतेही साधन नाही. त्याच व्यासपीठावर निवडणुकीसाठी मदतीचे धनादेश !  आ. लंके तुम्ही खरोखर भाग्यवान आहात ! तुमचं व माझं सारखंच आहे. फक्त माझ्या नावात दम आहे. मलाही तुमच्या सारखाच संघर्ष करावा लागला असे ते म्हणाले.

शरद पवार यांचा ५५ वर्षांचा राजकीय प्रवास पाहिला तर शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलेे काम त्यांनी केले असल्याचे कृतीतून दिसून येते. अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महिलांना संधी दिली. मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीला दोष दिला जातोय. परंतु न्यायालयात साक्ष पुरावे भाजपाच्या सरकारच्या काळात झाले, निकाल मात्र आमच्या काळात लागला मग आम्ही दोषी कसे असा सवाल त्यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post