एम. व्ही. देशमुख
नगर ः आपल्या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरतिथ्य केले जाते. तसाच आदरतिथ्यपणा नेटाने माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केला. त्यांनी स्वतःची खुर्ची आमदार रोहित पवार यांना देऊन स्वतः दुसरीकडे जाऊन बसले. त्यांचा हा मोठेपणा सर्वांनाच भावला आहे. त्यांच्या या कृतीची कार्यक्रमस्थळासह जिल्ह्यात सुरु होती.
नगर जिल्ह्यातील विविध चार महामार्गांचे भूमिपूजन आणि चार महामार्गांचे लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात मंत्री गडकरी यांनी जिल्ह्यातील रस्त्यांसाठी विकास निधी देत असल्याची घोषणा केली. यापेक्षा या कार्यक्रमातील माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दाखविलेल्या मोठेपणाची जिल्हाभर चर्चा सुरु आहे.
या कार्यक्रमाला नितीन गडकरी व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेते उपस्थित होते. या वेळी राम शिंदे गडकरी व पवार यांच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसले होते. त्यानंतर आमदार रोहित पवार पाठीमागून येत असल्याचे पाहून शिंदे स्वतःहून रांगेतील शेवटच्या खुर्चीवर जाऊन बसले.
खुर्चीसाठी प्रत्येकजण झडपडत असतो. मात्र स्वतःची खुर्ची देत नाही. परंतु या कार्यक्रमात स्वतःची खुर्ची आमदार रोहित पवार यांना देऊन शिंदे यांनी आपल्या मोठा पणा दाखवून दिलेला आहे. त्यांच्या या मोठेपणाची जिल्ह्यात सध्या चांगलीच चर्चा झालेली आहे.
संस्काराचा हा एक भाग असून त्याचा सर्वांनी बोध घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी या घटनेची बोध घ्यावा, अशीच अपेक्षा आता समाजमाध्यमातून व्यक्त केली जात आहे.
राम शिंदे यांनी स्वतःची खुर
Post a Comment