अमर छत्तीसे
श्रीगोंदा : ऑक्सिजन प्लँट उदघाटनाची तयारी प्रशासनाने जय्यत केली होती. कार्यक्रमाला येणार्यांच्या स्वागताची तयारी झाली होती. उद्घाटनस्थळी कोणशीला उभारली होती. ती कोणशीला वादाचे कारण ठरली. कार्यक्रमाला निमंत्रित केलेल्यांची नावे त्यावर कोरण्यात आलेली होती. मात्र ज्यांच्या निधीतून हा प्लँट उभारण्यात आला. त्यांचेच नाव एका कोपर्याला कोनशिलेवर कोरण्यात आले. त्यावरून या कार्यक्रमात अधिकार्यांची झाडझडती घेण्यात आली.
आमदार बबनराव पाचपुते यांच्या स्थानिक विकास निधीतून श्रीगोंदा तालुक्यातील गोरगरीब जनतेला कोरोनाच्या संकटात मदत मिळावी म्हणून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लँट व सुसज्य कोविड सेंटर ची उभारणी केली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते या सेंटरचे उदघाटन झाले.
या ठिकाणी लावलेल्या कोणशिलेवर जे मंत्री आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत त्यांची नावे वरच्या बाजूला आहे. पाचपुते यांचे नाव खाली टाकल्याचे आमदार पाचपुते यांच्या लक्षात आल्यावर पाचपुते चांगलेच संतापले.
त्यांनी निवासी जिल्हाधिकारी संदीप निचीत व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांना बोलावून चांगलाच संताप व्यक्त केला.
निधी माझा व नावे दुसऱ्या व्यक्तींची असे म्हणत ज्या अधिकार्याने ही चूक केली आहे त्यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले. यावेळी अधिकारी निरुत्तर झाले होते.
कार्यक्रम सगळा सुरळीत पार पडला. मात्र एका चुकीमुळे कार्यक्रमावर मात्र पाणी फेरले गेले. ही चूक नेमकी कोणाची अशी चर्चा सध्या श्रीगोंदे यात सुरु आहे.
Post a Comment