अमर छत्तीसे
श्रीगोंदा : येथील ग्रामीण रुग्णालयात आमदार बबनराव पाचपुते यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारलेल्या ऑक्सिजन प्लँटच्या उदघाटनात कोनशिलेवरुन वादंग निर्माण झाले होते. तीन ऑक्टोबरला संबंधित अधिकार्यांनी माफीनामाही दिला. त्यानंतर ही वादग्रस्त कोनशिला हटविण्यात आली आहे. मात्र या याबाबत जिल्हा प्रशासन अज्ञभिज्ञ असल्याचे दिसून आले.
तीन दिवसापूर्वी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आमदार बबनराव पाचपुते यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारलेल्या ऑक्सिजन प्लँटचे उदघाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. मात्र या कार्यक्रमाची कोनशीला पाहिल्यावर आमदार पाचपुते यांचा पारा चांगलाच चढला.
ज्या अधिकार्यांनी माझे नाव खाली टाकण्याची चूक केली आहे. त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी करण्याचा मनोदय अनेकांनी व्यक्त केला.
असा प्रकार वारंवार घडू नये, यासाठी कोनशिला प्रकरणात दोषी असणार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
पण या सर्व प्रकाराने प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले व तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल पोखर्णा यांनी काष्टी येथे आमदार बबनराव पाचपुते यांची भेट घेऊन चर्चा करून माफीनामा सादर केला. या घडलेल्या चुकीच्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान आज सकाळी ती वादग्रस्त कोणशीला हटविण्यात आली. पण या हटविण्यात आलेल्या कोणशीलेबाबत जिल्हा प्रशासन मात्र अज्ञभिज्ञ असल्याचे दिसून आले.
ही कोनशिला कोणी हटवली, कधी हटवली याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
Post a Comment