कोनशिला प्रकरणावर पडदा पडणार.... शल्यचिकित्सकांकडून माफीनामा...

 अमर छत्तीसे

श्रीगोंदा : श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लँटच्या उदघाटनात प्रोटोकॉल न पाळल्यामुळे भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी व शल्यचिकित्सकांना खडेबोल सुनावत दोषी अधिकार्यांवर हक्कभंग दाखल केला जाणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे शल्यचिकित्सकांसह काही अधिकार्यांनी आज (रविवारी) बबनराव पाचपुते यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली.


दोन ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे आमदार बबनराव पाचपुते यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आलेल्यु ऑक्सिजन प्लँटच्या उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. 

पण या कार्यक्रमाची कोणशीला बनविण्यासाठी आली होती या कोणशिलेवर जे जिल्ह्यातील मंत्री उपस्थित राहणार नव्हते. त्यांची नावे वरच्या बाजूला टाकण्यात आली. ज्यांचा स्थानिक विकास निधीतून हे काम झाले. त्या आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव खाली टाकले होते. त्यामुळे आ. पाचपुते कार्यक्रम स्थळी गेल्यावर चांगलेच संतापले. 

ज्या अधिकार्यांनी ही चूक केली आहे. त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे उपस्थित अधिकारी वर्गाची धांदल उडाली होती. 

रात्री आढळगाव जिल्हा परिषद गटाचे युवा नेते रमेश गिरमकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली.  आज जिल्हा शल्यचिकित्सक तातडीने काष्टी येथे आहे. 

आमदार बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी आले. झालेल्या चुकीबद्दल माफीनामा सादर केला आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संघर्ष राजुळे उपस्थित होते. 

कोणशिलेत झालेली चूक ही प्रोटोकॉल समितीकडून पुन्हा दुरुस्त करुन घेऊन बसविण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचीत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आला नव्हता. मी प्रोटोकॉल समिताचा प्रमुख असलो तरी संबंधितांनी मला सोशल मीडियावर पत्र टाकले होते. 

मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात असताना काल दोन ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता  संबंधितांनी श्रीगोंद्याच्या कार्यक्रमाची माहिती दिली. पण प्रोटोकॉल समितीकडून फक्त कार्यक्रम पत्रिका तयार करण्याचे काम असते. 

कोनशिला बनविणे हे संबंधित विभागाचे काम आहे तरी श्रीगोंद्याच्या कार्यक्रमात झालेल्या चुकीबद्दल  संबंधितांना यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचीत यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post