अमर छत्तीसे
श्रीगोंदा ः जिल्हा परिषदेचे ग्रामविकास अधिकारी झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा (ता. पाटोदा, जि. बीड) येथील दरीत उडी मारून आत्महत्या केली होेती. त्यांचा मृतदेह आठ दिवसांनी सापडला आहे. त्यामुळे आता गवांदे यांचे नातेवाईक व ग्रामसेवक संघटना आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका 50 वर्षीय इसमानी उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्येची ही घटना 24 सप्टेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
या ठिकाणी गवांदे यांचे ओळखपत्र सापडल्यानंतर आत्महत्या करणाऱ्याचे नाव स्पष्ट झाले होते. गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात त्यांच्या मृतदेहाचा शोध घेतला जात होता. तो मिळून आलेला आहे. मृतदेह सापडत नसल्याने ग्रामसेवक संघटनेने आक्रमक भूमिका घेत काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर प्रशासनाने शोध मोहिम वेगाने घेतली.
गवांदे यांनी ही आत्महत्या त्रासाला कंटाळून केलेली आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय व ग्रामसेवक संघटना आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment