पुणे ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री झालेले पहायचे आहे, असे प्रतिपादन ऱाष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेर यांनी केले.
महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी विरोधकांबरोबरच मित्रपक्षांनाही सूचक इशारा दिला जात आहेत. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील मेळाव्यात राष्ट्रवादीला इशारा दिला होता. आता राष्ट्रवादीने शिवसेनेला चिमटा काढला आहे.
अजित पवार यांना मुख्यमंत्री झालेले पाहायचे आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भरसभेत केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत ते कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.
शिरुरच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला मी अजित पवारांसोबत होतो. त्या इमारतीचा कोपरान कोपरा ते पाहत होते. त्यावेळी मनात विचार आला की याच पध्दतीने दादांनी पिपिरी-चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना येथील प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल.
खा. कोल्हे म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे ही भाग्याची गोष्ट आहे.
पण त्यांना जर देशाच्या पंतप्रधानपदी पाहायचे असेल तर त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये, असे काम आपण करायला हवे. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकत्यांना केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री झालेले पहायचे आहे, असे प्रतिपादन ऱाष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेर यांनी केले.
महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी विरोधकांबरोबरच मित्रपक्षांनाही सूचक इशारा दिला जात आहेत. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील मेळाव्यात राष्ट्रवादीला इशारा दिला होता.
आता राष्ट्रवादीने शिवसेनेला चिमटा काढला आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री झालेले पाहायचे आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भरसभेत केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत ते कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.
शिरुरच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला मी अजित पवारांसोबत होतो. त्या इमारतीचा कोपरान कोपरा ते पाहत होते. त्यावेळी मनात विचार आला की याच पध्दतीने दादांनी पिपिरी-चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना येथील प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल.
खा. कोल्हे म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे ही भाग्याची गोष्ट आहे. पण त्यांना जर देशाच्या पंतप्रधानपदी पाहायचे असेल तर त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये, असे काम आपण करायला हवे. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकत्यांना केले.
Post a Comment