शरद पवार म्हणाले...गडकरी कामे मंजूर करताना राजाकारण पहात नाही...

नगर ः रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती देण्याचे काम केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी करत आहेत. अन्य राज्यात रस्त्याने प्रवास करताना जेव्हा लोक भेटतात, तेव्हा ते गडकरी यांची कृपा असल्याचे सांगतात. गडकरी कामे मंजूर करताना राजकारण पाहत नाहीत, मागणी काय आहे ते पाहतात. त्यामुळ सर्व पक्षाच्या लोकांची कामे होतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे  अध्यक्ष शरद पवार यांनी केले.


जिल्ह्यातील महामार्गांचे भूमिपूजन व लोकार्पणाचा सोहळा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 
यांच्या उपस्थितीत आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यकर्मात शरद पवार यांनी यावेळी गडकरी यांच्या कामाचे दूरदृष्टीचे  कौतुक केले. 

पवार म्हणाले की, कार्यक्रमाला गेले की वर्षानुवर्षे काही बदल दिसत नाही. पण गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेले की दोन चार दिवसांत फरक दिसतो. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसे योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येते, असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post